नांदेड, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। धनगर समाजाच्या एस. टी. प्रवर्गातील आरक्षण मागणीस नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पवार यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे
महाराष्ट्रात बहुसंख्येने असणा-या धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण मागणीसाठी श्री. दिपक बो-हाडे यांचे जालना येथे उपोषण सुरू आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही अनेक वर्षांची मागणी असून या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी आपले एक निवेदन देखील सरकारकडे दिले आहे.
याच अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना आमदार पवार यांनी पत्र लिहून या मागणीस माझा पाठिंबा दर्शवला आहे.
धनगर समाज बांधवांच्या मागणीचा संवेदनशीलतेने विचार करुन धनगर समाजाला विशेष मागास प्रवर्गातून (ओबीसी) एसटी प्रवर्गात सामावून घेत आरक्षण देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis