परभणी, 30 सप्टेंबर, (हिं.स.) - परभणी जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात म्हणून भारतीय जैन संघटना, सकल जैन समाज व सर्व समाजबांधव यांच्या वतीने पाथरी तालुक्यातील रामपुरी खुर्द येथे मदतवाटप करण्यात आले.
या उपक्रमात पूरबाधित ३० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे ३० किट देण्यात आले. यात गव्हाचे पीठ, साखर, तांदूळ, तेल, तूर व हरभरा डाळ, शेंगदाणे, साबुदाणा, रवा, पोहा, गूळ, मसाले (मिरची, हळद), मीठ, चहा पत्ती यांसह अंगसाबण, कपड्यांचा साबण, कपडे, शर्ट, पॅन्ट, साड्या, ब्लँकेट आदींचा समावेश होता. याशिवाय लहान मुला-मुलींना कपडे व खाऊचे वाटपही करण्यात आले.
या वेळी परभणी येथील भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी, सकल जैन समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव, रामपुरी खुर्द गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पूरग्रस्तांना दिलेल्या या मदतीमुळे बाधित कुटुंबांना दिलासा मिळाल्याचे प्रतिपादन ग्रामस्थांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis