जळगावमध्ये महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास
जळगाव , 30 सप्टेंबर (हिं.स.) : नवीन बसस्थानक परिसरातून एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. चोरट्याने सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरली आहे. यासंदर्भात अखेर २८ सप्टेंबर रोजी रात्र
जळगावमध्ये महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास


जळगाव , 30 सप्टेंबर (हिं.स.) : नवीन बसस्थानक परिसरातून एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. चोरट्याने सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरली आहे. यासंदर्भात अखेर २८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर येथील कल्पना सुनील लखोटे (वय ५९, रा. माळी गल्ली, जामनेर) या आपल्या कामासाठी जळगाव शहरात आल्या होत्या. त्यांचे खासगी काम संपल्यानंतर जामनेरला जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर आल्या असता. त्याच वेळी, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची सोनसाखळी चोरून पळ काढला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande