अमरावती : अवैध गुटख्यासह आरोपीला अटक
अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.) : अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या अवैध धंद्यावरील कारवाईच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत शासन प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल
शासन प्रतिबंधित गुटख्याची 15 लाखांची अवैध वाहतूक उघडकीस  स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई – आरोपी ताब्यात, मुद्देमाल जप्त


अमरावती, 30 सप्टेंबर (हिं.स.) : अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या अवैध धंद्यावरील कारवाईच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत शासन प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल 15 लाख 42 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेंदूरजनाघाट पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली. पांढुर्णा येथून वरुडकडे एका काळ्या रंगाच्या महिंद्रा स्कार्पिओद्वारे प्रतिबंधित गुटखा वाहून नेला जाणार असल्याची माहिती मिळताच पुसला टोल येथे नाकाबंदी लावण्यात आली.नाकाबंदी दरम्यान संशयित स्कार्पिओ (क्र. MH 27 DL 7197) थांबवून तपासणी केली असता आरोपी मंधू कुचबिहारी पणपालिया (वय 38, रा. धामणगाव रेल्वे) हा गाडीतून तंबाखू मिश्रित सुगंधित पान मसाला व गुटखा वाहतूक करत असल्याचे उघड झाले सदर कारवाईत, गुटखा (किंमत रु. 4,38,750/-), महिंद्रा स्कार्पिओ (किंमत रु. 10,00,000/-) दोन मोबाईल (किंमत रु. 1,04,150/- अंदाजे) असा एकूण 15,42,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस शेंदुरजनाघाट पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, पोलिस अमलदार रवींद्र बावणे, बळवंत दाबणे, गजेंद्र ठाकरे, पंकज फाटे, तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक वानखडे यांचा समावेश होता. जिल्ह्यातील अवैध गुटखा वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईने पुन्हा एकदा धाक बसला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande