अफगाणिस्तानात इंटरनेट सेवा बंद, मोबाईल नेटवर्कही बंद,
काबूल, 30 सप्टेंबर (हिं.स.)।अफगाणिस्तानमध्ये सोमवारपासून (२९ सप्टेंबर) इंटरनेट आणि मोबाइल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तालिबान सरकारच्या आदेशानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. काबूल, उरुजगान, मजार-ए-शरीफ आणि हेरातसह अनेक शहरांमध्ये फायबर-ऑप्टिक
अफगाणिस्तानात इंटरनेट सेवा बंद, मोबाईल नेटवर्कही बंद,


काबूल, 30 सप्टेंबर (हिं.स.)।अफगाणिस्तानमध्ये सोमवारपासून (२९ सप्टेंबर) इंटरनेट आणि मोबाइल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तालिबान सरकारच्या आदेशानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. काबूल, उरुजगान, मजार-ए-शरीफ आणि हेरातसह अनेक शहरांमध्ये फायबर-ऑप्टिक इंटरनेट सेवा बंद झाली आहे. काही वेळासाठी मोबाइल इंटरनेट सेवा सुरू होती, परंतु सिग्नल टॉवर्स बंद झाल्यामुळे तीही ठप्प झाली.अहवालानुसार, मोबाइल सेवांबरोबरच सॅटेलाइट टीव्ही सेवाही प्रभावित झाली आहे. तालिबान सरकारने पुढील आदेश येईपर्यंत इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्क बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, काबूल विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या अनेक फ्लाइट्सवर याचा परिणाम झाला असून काही फ्लाइट्स रद्द देखील करण्यात आल्या आहेत. याआधी कंधार, बल्ख, उरुजगान आणि निमरोजमध्ये फायबर-ऑप्टिक नेटवर्क बंद करण्यात आले होते, पण आता संपूर्ण देशात इंटरनेट सेवा बंद केली गेली आहे.या ब्लॅकआउटमुळे आंतरराष्ट्रीय कॉल करणे देखील अशक्य झाले आहे. मोबाइल नेटवर्क बंद असल्यामुळे अफगाणिस्तानातील लोक व्यावसायिक किंवा कौटुंबिक कारणांसाठी एकमेकांशी संपर्क साधू शकत नाहीत.

तालिबान सरकारकडून इंटरनेट बंद करण्यामागचं कारण अधिकृतरित्या सांगितलं गेलेलं नाही, पण असे म्हटले जात आहे की अनैतिक गतिविधींना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीमुळे आधीपासूनच अनेक निर्बंध लागू आहेत आणि आता इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे परिस्थिती आणखीनच कठीण झाली आहे.तालिबानने मुलींना शाळा आणि विद्यापीठांमध्ये जाण्यावर आधीच बंदी घातली आहे, आणि आता ऑनलाइन वर्गही घेता येणार नाहीत. असे मानले जाते की अफगाणिस्तानमध्ये महिलांवर सर्वात कठोर निर्बंध लादले गेले आहेत. तसेच, इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे स्थानिक व्यवसायांवरही मोठा परिणाम होऊ शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande