लातूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। मानवी आयुष्यात वसुंधरेचे अनन्यसाधारण महत्व आहे. हेच महत्व सांगण्याच्या उद्देशाने वसुंधरा पायी दिंडी मार्गक्रमण करीत आहे. आज लातूर जिल्ह्यामध्ये वसुंधरा पायी दिंडी चे स्वागत आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ,नाणीजधाम आयोजित वसुंधरा पायी दिंडीचे लातूर तालुक्यातील ममदापुर येथे आज आगमन झाले. लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी स्वागत केले. यानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला आहे या जनकल्याण कार्यात सहभाग घेतल्याबद्दल उपस्थित भक्तांना शुभेच्छा देऊन पुढील प्रवासासाठी निरोप दिला. याप्रसंगी देशपांडे, विशाल डोंगरे, मा श्री अंकुश आठाने,आदी मान्यवरासह लातूर जिल्हा सेवा समिती चे सदस्य,काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते,भक्त,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis