छत्रपती संभाजीनगर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना मार्गदर्शक ठरावी म्हणून ग्रंथालय संचालनालयामार्फत वर्षनिहाय ‘शासनमान्य ग्रंथांची यादी’ प्रकाशित केली जाते. त्यासाठी सन २०२४ या कॅलेंडर वर्षात ( दि.१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४) मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्तीच्या ग्रंथांच्या प्रत्येकी एक प्रत विनामूल्य (Complimentary copy) दि. १५ ऑक्टोबर पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टाऊन हॉल, मुंबई – ४००००१ येथे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जर संबंधित ग्रंथ यापूर्वीच संचालनालयाकडे पाठविले असतील, तर पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही. हेच निवेदन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in तसेच ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती प्र. ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis