कोल्हापूर : भादोले येथे पतीकडून विवाहितेची हत्या
कोल्हापूर, 30 सप्टेंबर (हिं.स.) : भादोले (ता. हातकणंगले) येथील विवाहितेचा पतीने कोयत्याने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली. पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर कोयत्याने सपासप वार करत आरोपीने तिचा खून केला. र
मयत रोहिणी प्रशांत पाटील


कोल्हापूर, 30 सप्टेंबर (हिं.स.) : भादोले (ता. हातकणंगले) येथील विवाहितेचा पतीने कोयत्याने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली. पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर कोयत्याने सपासप वार करत आरोपीने तिचा खून केला. रोहिणी प्रशांत पाटील (वय २८, रा. भादोले) असे मृत विवाहितेचे नाव असून, प्रशांत पाटील असे आरोपी पतीचे नाव आहे. घटना भादोले-कोरेगाव रस्त्यावर झुंजीनाना मळ्याजवळ सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. .

रोहिणी व प्रशांत पाटील हे दोघे ढवळी (जि. सांगली) येथून मोटारसायकलवरून परत भादोले येथे येत होते. दरम्यान, रस्त्यातच प्रशांतने रोहिणीच्या डोळ्यात चटणी फेकली व कोयत्याने तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार करून तिला ठार मारले. खून केल्यानंतर प्रशांत गावात येऊन काही स्थानिकांना पत्नीचा खून केला आहे, मुलींकडे लक्ष ठेवा, मी आता ५-६ महिने येणार नाही असे सांगून फरार झाला. घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलीसानां कळवली. वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशांत पाटील याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत पंचनामा व गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande