त्र्यंबकेश्वर : गिरीश महाजन देव दर्शनासाठी निल पर्वतावर
त्रंबकेश्वर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। त्र्यंबकेश्वर येथील निल पर्वतावर मंत्री गिरीश महाजन यांनी धावती भेट दिली यावेळी पाऊस उघडल्यानंतर कुंभमेळा कामाला विकासाला चालना द्यावी या दृष्टीने साधुनी मागणी केली झाली.या वेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा व प्रशासन अध
निल पर्वतावर मंत्री  महाजन यांनी दिली भेट. संकट निवारण व्हावे म्हणून प्रार्थना.


त्रंबकेश्वर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। त्र्यंबकेश्वर येथील निल पर्वतावर मंत्री गिरीश महाजन यांनी धावती भेट दिली यावेळी पाऊस उघडल्यानंतर कुंभमेळा कामाला विकासाला चालना द्यावी या दृष्टीने साधुनी मागणी केली झाली.या वेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा व प्रशासन अधिकारी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर येथे निलगंगा भगवती चौक या परिसराला महाजन यांनी भेट दिली पाहणी केली . श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर शिवगिरी महाराज सचिव श्रीमंहंत दीपक गिरी महाराज सचिव श्रीमहंत रामेश्वर गिरी महाराज, सचिव देवगिरीजी महाराज व आखाड्याचे ठाणापती व साधुगण तसेच विश्व आनंद गिरी महाराज उपस्थित होते.. यावेळी पावसामुळे उद्भवलेले संकट अधिक वाढू नये म्हणून अशी प्रार्थना साधंकडून येथील निलांबिका देवी नवदुर्गां मंदिर येथे करण्यात आली असे सांगण्यात आले यावेळी भाजप भाजप पदाधिकारी देखील उपस्थित होते.आखाड्याचे पुरोहित्य त्रिविक्रम जोशी मंदिर पुजारी सतीश दशपुत्र उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande