नांदेड, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। सरकार शेतकऱ्यांच्या संपूर्ण पाठीशी आहे, आवश्यक ती मदत निश्चितपणे सरकार करणार असल्याचा उल्लेख नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे खासदार, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. नांदेड जिल्ह्यातील पाहण दौऱ्यात शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी आज नांदेड तालुक्यातील निळा, आलेगाव, एकदरा, भालकी, चिखली बु., पासदगाव, पुयनी परिसरात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करून गावकऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, भाजपचे नांदेड महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, नांदेड उत्तर विधानसभा प्रमुख मिलिंद देशमुख, नांदेड ग्रामीण तालुकाध्यक्ष बापूराव उर्फ बंडू पावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis