मुंबई, 30 सप्टेंबर (हिं.स.)। चिनी टेक कंपनी ओप्पो १६ ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर आपली नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन मालिका फाइंड एक्स९ लाँच करणार आहे. या मालिकेत फाइंड एक्स९ आणि फाइंड एक्स९ प्रो हे दोन मॉडेल्स असतील. लाँचपूर्वीच दोन्ही स्मार्टफोन्सचे डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले असून त्यामुळे तंत्रज्ञानप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. फाइंड एक्स९ स्मार्टफोन स्लिम, हलका आणि प्रीमियम डिझाइनसह येणार असून त्याची जाडी फक्त ७.९९ मिमी व वजन २०३ ग्रॅम असेल. या मॉडेलमध्ये फ्लॅट रियर पॅनल, मेटॅलिक फ्रेम, उजव्या बाजूस पॉवर बटण व व्हॉल्यूम कंट्रोल्स अशी रचना आहे. हा फोन व्हेल्व्हेट टायटॅनियम, फ्रॉस्ट व्हाईट आणि मिस्ट ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल, तर प्रो व्हेरिअंट दोन रंग पर्यायांमध्ये येईल. सुरक्षेसाठी अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP66/IP68/IP69 रेटिंगमुळे पाणी व धूळ प्रतिरोधक तंत्रज्ञान यात देण्यात आले आहे. या मालिकेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कॅमेरा सेटअप. फाइंड एक्स९ मध्ये क्वाड रिअर कॅमेरा दिला असून त्यात ५० मेगापिक्सेलचा सोनी LYT808 मुख्य सेन्सर, ५० मेगापिक्सेलचा सॅमसंग जेएन5 अल्ट्रावाइड लेन्स, सोनी LYT600 पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि २ मेगापिक्सेलचा मल्टी-स्पेक्ट्रल लेन्स यांचा समावेश आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असेल. प्रो मॉडेलमध्ये २०० मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा सुपर झूमसह मिळेल. दोन्ही फोनमध्ये चौकोनी कॅमेरा मॉड्यूल आणि एलईडी फ्लॅश असेल. याशिवाय कंपनीने डॅन्क्सिया कलर रिप्रोडक्शन लेन्स दिला आहे, ज्यामुळे आकाशाचा निळा रंग, त्वचेचा नैसर्गिक पोत आणि सूर्यास्ताचा उबदारपणा फोटो आणि व्हिडिओंमध्ये अधिक वास्तविक दिसणार आहे. डिस्प्ले विभागात फाइंड एक्स९ मध्ये ६.५९ इंचाचा OLED फ्लॅट स्क्रीन असून तो 1.5K रिझोल्यूशन आणि डोळ्यांचे संरक्षण वैशिष्ट्यांसह येतो. अल्ट्रा-नॅरो बेझल्समुळे स्क्रीन जवळजवळ पूर्ण पुढील भाग व्यापते. कंपनीचा दावा आहे की या मालिकेचा डिस्प्ले आयफोनपेक्षा चांगली ब्राइटनेस एकरूपता देईल व ३६०० निट्स पीक ब्राइटनेसपर्यंत पोहोचेल. या मालिकेत मीडियाटेक डायमेन्सिटी ९५०० चिपसेट दिला असून गेमिंग, मल्टीटास्किंग आणि एआय वैशिष्ट्यांसाठी उत्कृष्ट कार्यक्षमता मिळेल. अँड्रॉइड १६ आधारित कलर ओएस १६ सॉफ्टवेअरमुळे वापराचा अनुभव लैग फ्री आणि फिचर्सनी समृद्ध असेल. बॅटरीबाबत फाइंड एक्स९ मध्ये ७०२५ mAh क्षमता असून तो ८०W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि ५०W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. प्रो मॉडेलमध्ये ७५०० mAh बॅटरी असेल जी दीड ते दोन दिवस सहज टिकेल. या मालिकेतील फाइंड एक्स९ ची किंमत सुमारे ६०,००० ते ७०,००० रुपयांदरम्यान असण्याची अपेक्षा आहे, तर प्रो मॉडेलची किंमत ८०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल. या दोन मॉडेल्सचा थेट मुकाबला अॅपलच्या आयफोन १६ आणि सॅमसंग गॅलेक्सी S25 शी होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule