काश्मिर ते कन्याकुमारी स्वर्वेद यात्रेनिमित्त सत्संगाचे आयोजन
नाशिक, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। शहरात २५ हजार कुंडीय-स्वर्वेद ज्ञान महायज्ञाची भाविकांमध्ये उत्सुकता आहे. या उपक्रमात सहभागाचा चांगला अनुभव भाविकांना येत आहे. या ऐतिहासिक महायज्ञाचे साक्षीदार होण्याची भाविकांना संधी उपलब्ध असून, अधिकाधिक संख्येने सहभाग
काश्मिर ते कन्याकुमारी स्वर्वेद यात्रेनिमित्त सत्संगाचे आयोजन


नाशिक, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। शहरात २५ हजार कुंडीय-स्वर्वेद ज्ञान महायज्ञाची भाविकांमध्ये उत्सुकता आहे. या उपक्रमात सहभागाचा चांगला अनुभव भाविकांना येत आहे. या ऐतिहासिक महायज्ञाचे साक्षीदार होण्याची भाविकांना संधी उपलब्ध असून, अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विज्ञानदेव महाराज यांनी केले. मखमलाबाद लिंकरोडवरील धनदाई लॉन्स येथे 'विहंगम योग'तर्फे सोमवार, दि. २९ सप्टेंबर रोजी आयोजित आध्यात्मिक सत्संग सोहळ्यात निरुपण करताना ते बोलत होते.

येत्या नोव्हेंबर महिन्यात 'विहंगम योग संस्थान' आपला १०२वा वार्षिकोत्सव वाराणसी येथील स्वर्वेद महामंदिर धामच्या परिसरात साजरा करणार आहे. या कार्यक्रमात २५० एकर जागेवर २५ हजार कुंडीय-स्वर्वेद ज्ञान महायज्ञ संपन्न होणार आहे. या उपक्रमानिमित्त विज्ञानदेव

महाराज यांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्र व अहिल्यानगरच्या भाविकांना उपदेश दिला.

कुंभनगरी नाशिकला विशेष धार्मिक महत्त्व असून यानिमित्त नाशिकच्या भाविकांशी वार्तालाप होत आहे. भाविकांचे प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि समर्पण भावामुळे काश्मिरपासून सुरू झालेली ही यात्रा यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच काश्मिरमधील लाल चौकात तिरंगा आणि अंकित स्वर्वेद ध्वज फडकवून या यात्रेला प्रारंभ झाला. या यात्रेला प्रतिसाद वाढत असून, २५ हजार कुंडीय वैदिक महायज्ञ यशस्वी होण्याचा संकल्प भाविक करत आहेत. भव्य अशा राष्ट्रव्यापी आध्यात्मिक स्वर्वेद संदेश यात्रेत सहभागी झाल्याबद्दल त्यांनी भाविकांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande