नांदेड, 30 सप्टेंबर (हिं.स.)।राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने यंदा नांदेड शहरात नऊ ठिकाणी पथसंचलन व विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . इ. स .१९२५ च्या विजयादशमीच्या दिवशी स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत.प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विजयादशमीच्या दिवशी दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी रा . स्व. संघातर्फे सघोष पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे .
संचलनाच्या नंतर लगेचच विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन होईल.
तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुके व ग्रामीण भागात देखील ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पथसंचलन व विजयादशमी उत्सव होणार आहेत.
कार्यविस्ताराच्या हेतूने यावर्षी शहरातील विविध नऊ भागांमध्ये हे पथसंचलन आयोजित करण्यात आलेले असून २८ सप्टेंबर रोजी गाडीपुरा येथे पथसंचलन संपन्न झाले असून उर्वरित आठ संचलने ही २ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध भागात होतील.
सिडकोतील पथससंचलन स्वामी समर्थ केंद्र सिडको येथून सकाळी ७.१५ वाजता निघेल ,
कौठा भागातील पथसंचलन शिवगोविंद मंगल कार्यालय येथून ७.३० वाजता,
बोरबन भागातून ओम साई हॉस्पिटल येथून सकाळी ८.१५ वाजता ,
बजाज नगर ,हनुमान मंदिर येथून सकाळी ७.१५ वाजता ,
महावीर सोसायटी हनुमान मंदिर येथून सकाळी ७.३० वाजता,
मालेगाव रोड, गजानन महाराज मंदिरासमोरील शनी मंदिर येथून सकाळी ७.१५ वाजता ,
अशोक नगर हनुमान मंदिर येथून सकाळी ७.१५ वाजताव तुळजाभवानी मंदिर, हनुमान गड कमानी समोरुन सकाळी ८.०० वाजता ही आठ संचलने निघतील. संचलनानंतर त्या त्या ठिकाणी शस्त्र पूजन व बौद्धिक कार्यक्रम होतील.
दिनांक १२ ऑक्टोबर ,रविवार रोजी संघाचे अखिल भारतीय सहसरकार्यवाह श्री अरुणकुमारजी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागार्जुना इंग्लिश स्कूल, कौठा येथे विजयादशमी उत्सव संपन्न होईल. त्यात सर्व नागरिकांची लक्षणीय उपस्थिती राहील अशी माहिती शहरसंघचालक डॉ. गोपाल राठी यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis