संगिता जिंदाल यांना फ्रान्सचा ‘शेव्हेलियर’ पुरस्कार प्रदान
मुंबई, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। भारतातील फ्रान्सचे राजदूत महामहिम थिएरी माथू यांनी जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल यांना फ्रान्सच्या सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असलेल्या शेव्हेलियर दे ल''ऑर्ड्रे देस आर्ट्स एट देस लेट्रेसचे (नाई
Sangeeta Jindal and Ambassador of France


मुंबई, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। भारतातील फ्रान्सचे राजदूत महामहिम थिएरी माथू यांनी जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल यांना फ्रान्सच्या सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असलेल्या शेव्हेलियर दे ल'ऑर्ड्रे देस आर्ट्स एट देस लेट्रेसचे (नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स) सन्मान चिन्ह प्रदान केले. संगीता जिंदाल यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा सन्मान त्यांना देण्यात आला. भारतातील कला, संस्कृती आणि वारसा संवर्धनातील अपवादात्मक योगदान तसेच भारत-फ्रेंच सांस्कृतिक संबंधांना चालना देण्याच्या संगीता जिंदाल यांच्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आला.

जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या प्रमुख असलेल्या संगीता जिंदाल यांच्यासाठी संस्कृतीला सर्वोच्च महत्त्व आहे. त्यांच्या प्रत्येक ध्येयाच्या केंद्रस्थानी सांस्कृतिक वारसा आहेच. फ्रान्ससोबत त्यांनी अनेक नवीन गतिमान भागीदारी तयार केल्या आहेत. हंपी आर्ट लॅब्समधील कलाकारांच्या निवासस्थानांद्वारे, त्यांनी भारत आणि फ्रेंच कलाकारांमध्ये परस्पर संवादासाठी उत्तम जागा निर्माण केल्या आहेत. पॅरिस ऑलिंपिक दरम्यान कला आणि खेळ यांच्यातील संवाद अधोरेखित करण्यासाठी 2024 मध्ये त्यांनी फ्रान्ससोबत सहकार्य केले. तर या वर्षाच्या अखेरीस, त्या पॅरिसमधील मोबिलियर नॅशनल येथे टेक्सटाइल मॅटर्स प्रदर्शनात भाग घेतील.

पुरस्कार प्रदान करताना राजदूत थिएरी माथू म्हणाले: त्यांची आवड, दूरदृष्टी आणि उदार दृष्टिकोनाद्वारे, संगीता जिंदाल यांनी भारताचा सांस्कृतिक दृष्टिकोन खोलवर आत्मसात केला आहे. तसेच आपल्या दोन्ही देशांना एकमेकांच्या जवळ आणले आहे. हा सन्मान म्हणजे त्यांच्या कामगिरीबद्दल आणि सांस्कृतिक पूल बांधण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल फ्रान्सला वाटणारी कृतज्ञता आणि कौतुक दर्शवते. या दोन देशांमधील अतिशय फलदायी सहकार्य आणि संवादाची ही केवळ सुरुवात याची मला खात्री आहे.

कृतज्ञतेने हा पुरस्कार स्वीकारताना संगीता जिंदाल म्हणाल्या: फ्रान्सकडून झालेल्या या गौरवामुळे मला खूप आनंद झाला आहे. दोन्ही देशांमध्ये अर्थपूर्ण सांस्कृतिक पूल बांधताना भारताच्या वारशाचे रक्षण करण्याच्या माझ्या वचनबद्धतेला यामुळे प्रोत्साहन मिळाले आहे. ज्यांच्यासोबत काम करण्याचा मला बहुमान मिळाला असे अनेक कलाकार, कारागीर, संरक्षक आणि संस्था यांच्याप्रती कृतज्ञ राहून मी हा सन्मान स्वीकारते आहे. वारसा हा पिढ्यांना जोडणारा एक दुवा आहे आणि हा वारसाच भविष्याला प्रेरणा देत राहील, यासाठी मी कायम कार्यरत राहीन.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande