नाशिक : स्क्रॅपपासून वेस्ट तो वंडर कलाकृती
मनपाच्या वतीने मायको सर्कलचे सुशोभीकरण नाशिक, 30 सप्टेंबर (हिं.स.) : नाशिक महानगर पालिकेच्या वतीने शाश्वत पर्यावरण आणि कला यांची सांगड घालत अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून टाकाऊ पासून कला, वेस्ट टू वंडर ही १५ दिवसांची कार्यशाळा घेण्
स्क्रॅपपासून वेस्ट तो वंडर कलाकृती


स्क्रॅपपासून वेस्ट तो वंडर कलाकृती


मनपाच्या वतीने मायको सर्कलचे सुशोभीकरण

नाशिक, 30 सप्टेंबर (हिं.स.) : नाशिक महानगर पालिकेच्या वतीने शाश्वत पर्यावरण आणि कला यांची सांगड घालत अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून टाकाऊ पासून कला, वेस्ट टू वंडर ही १५ दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली. या करीता देशभरातून ६ कलाकारांकडून नाशिक शहरात स्क्रॅपपासून कलाकृती तयार केली आहे.

या कलाकृती एकत्रितपणे पर्यावरणाचे महत्त्व आणि शाश्वत अस्तित्व या मध्यवर्ती संकल्पनेवर प्रकाश टाकत नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांबाबतच्या कलाकुसर कलाकारांनी तयार केल्या आहेत. यामधील पर्वत, स्त्री गोमुख, कमळ या कलाकृतींमधून पर्यावरणाचे पालन, पोषण करणारे आणि पवित्र स्वरूप दर्शवतात तसेच सजीव परिसंस्था आणि पाण्याचे संरक्षण करण्याचे आवाहन करतात. मासा, घरे, पानांनी आच्छादलेले घर, पाण्याच्या जीवसृष्टीवर आणि नद्यांवर मानवी वस्त्यांचे असलेले अवलंबित्व दर्शवतात. या रचना शाश्वत जीवनशैलीचा पुरस्कार करतात, जिथे वास्तुकला निसर्गापासून वेगळी नसते यांचा बोध होणे करिता कलाकृती तयार केली आहे. हात, गरुड मानवी प्रगती आणि आकांक्षा निसर्गाच्या संतुलनाने मार्गदर्शित असाव्यात याची सांगड घालून दर्शवतात आणि गरुड, पृथ्वी, औद्योगिक घंटा शाश्वततेसाठी सक्रिय दृष्टिकोन ठेवण्याचे समर्थन करणारे प्रतीक मांडलेले आहे. ते पृथ्वीचे संरक्षण करण्याचे आपले पवित्र कर्तव्य आणि औद्योगिक कच-याच्या पुनर्वापरातील सर्जनशील क्षमता यावर भर देऊन ही कला साकारली आहे.

एकंदरीत, या सर्व कलाकृती एकसंध संदेश देताना दिसतात. मानवता आणि निसर्ग अविभाज्य आहेत, आणि आपले भविष्य महत्त्वाचे संसाधने जपून, जैवविविधता टिकवून आणि शाश्वत जीवनशैली स्वीकारूनच सुरक्षित करता येईल यांचा संदेश देत नाशिक महापालिकेतील ४ टन स्क्रॅप मेटल (भंगार) पासन तयार केल्या असून, ही कलाकृती मायको सर्कल येथे नागरिकांनी शाश्वत पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी साकारले आहे. सद्या स्थितीत हा प्रकल्प चालू असून पुढे नाशिक शहरातील सौंदर्यात भर पाडणारा आहे.

याकरीता इंडेक्स आर्टचे रुचिर पंचाक्षरी यांच्या समवेत भारतातील विविध ठिकाणांहून कलाकार बोलविण्यात आले होते. यामध्य जुई अहिरे, नेहा बांगळूरकर जितीन जयकुमार, शुभम मिश्रा अभिषेक साळवे आणि गौरव महाजन या कलाकारांचा समावेश होता. हा पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याकरीता आयुक्त मनिषा खत्री यांच्याकडून कलाकारांचा पर्यावरण दूत म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी नाशिक महानगरपालिकेचे पर्यावरणउपायक्त नितीन पवार, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande