नाशिक, 30 सप्टेंबर (हिं.स.) : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यातर्फे ब्रह्मा व्हॅली पब्लिक स्कूल (त्र्यंबकेश्वर) येथे तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आदिवासी विकास विभागाच्या शिरसगाव शासकीय आश्रमशाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. स्पर्धेच्या १७ वर्षांखालील मुलीच्या संघाने विजेतेपद पटकविले. या कामगिरीच्या आधारे शिरसगाव शासकीय आश्रमशाळेची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ भोगले, संघ व्यवस्थापक सिता भोये, लिला महाले यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघाचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण महाले, हिरामण टोपले, मुख्याध्यापक दीपक भास्कर, अधिक्षिका पुणम बावणे आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV