सोलापूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। मध्य रेल्वेने सहा महिन्यांत कवचच्या चाचण्या यशस्वी करण्याचा इतिहास रचला आहे. ५ रेल्वे विभागांमध्ये कामे मंजूर झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत कवच कार्यान्वित करण्यात मध्य रेल्वेला यश आले. विशेष म्हणजे मध्य रेल्वेतील पहिली चाचणी सोलापूर विभागात झाली होती. कवच प्रणाली यशस्वी करण्यात मध्य रेल्वे ही पहिली क्षेत्रिय रेल्वे ठरली आहे. कवच कामासाठी निविदा मंजूर झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत सर्व विभागांमध्ये चाचण्या पूर्ण केल्या आहेत. यावर्षीच्या सुरवातीला, मध्य रेल्वेने मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर या पाच विभागांमध्ये पसरलेल्या संपूर्ण सुमारे चार हजार मार्ग किलोमीटर रेल्वे मार्गावर कवच उपलब्ध करून देण्यासाठी निविदा मंजूर करणारी मध्ये रेल्वे ही पहिली क्षेत्रीय रेल्वे ठरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड