सोलापुरात पिस्तुलासह दोन तरुणांना अटक
सोलापूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। मूळचा कर्नाटकातील रमेश विश्वनाथ धूळ याने देशी बनावटीच्या दोन गावठी पिस्टल आणून सोलापुरातील दोन तरुणांना पोच केल्या होत्या. त्यासोबत दहा गोळ्या (जिवंत काडतुसे) देखील होत्या. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने सचिन सिद्धा
सोलापुरात पिस्तुलासह दोन तरुणांना अटक


सोलापूर, 30 सप्टेंबर (हिं.स.)। मूळचा कर्नाटकातील रमेश विश्वनाथ धूळ याने देशी बनावटीच्या दोन गावठी पिस्टल आणून सोलापुरातील दोन तरुणांना पोच केल्या होत्या. त्यासोबत दहा गोळ्या (जिवंत काडतुसे) देखील होत्या. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने सचिन सिद्धाराम झगळघंटे (वय ३८, रा. कर्देहळ्ळी) व फरहान अखिल शेख (वय १९, रा. अमन चौक, नवीन विडी घरकूल) या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे.सोलापूर-अक्कलकोट रोडवरील बीएसएनएल टॉवरजवळील सर्व्हिस रोडवर एक पांढऱ्या रंगाची कार थांबली आहे. त्याठिकाणी एक दुचाकी देखील असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल असल्याची खबर पोलिस हवालदार भारत पाटील यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वातील पोलिस अंमलदार अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, कुमार शेळके, राजू मुदगल, महेश पाटील, सिद्धाराम देशमुख या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. या पथकाने सापळा रचून तेथील सचिन झगळघंटे व फरहान शेख या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यावर दोन बंदुका व दहा गोळ्या पोलिसांना मिळाल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande