रत्नागिरी : करिअर, कौशल्य विकास कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
रत्नागिरी, 30 सप्टेंबर, (हिं. स.) : येथील देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात भविष्यातील करिअर क्षेत्र व डिजिटल कौशल्य विकास या एकदिवसीय कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल आणि अ
करिअर, कौशल्य विकास कार्यशाळा


रत्नागिरी, 30 सप्टेंबर, (हिं. स.) : येथील देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात भविष्यातील करिअर क्षेत्र व डिजिटल कौशल्य विकास या एकदिवसीय कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते आणि परफेक्ट अकाउंटिंगचे महेश गर्दे आणि योगिता कॉम्प्युटर्सचे संचालक राधेय पंडित उपस्थित होते. सुरवातीला प्लेसमेंट सेलच्या प्रमुख प्रा. वसुंधरा जाधव यांनी प्रास्ताविकातून प्लेसमेंट सेलचे कार्य, त्याचे महत्त्व, आगामी योजनांची माहिती दिली.महेश गर्दे यांनी अकाउंटिंग व मॅनेजमेंट क्षेत्रातील टॅली सॉफ्टवेअरचे महत्त्व आणि करिअरच्या संधींबाबत माहिती दिली. राधेय पंडित यांनी विविध डिजिटल कोर्सेसविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी संवाद सत्रामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम अधिक समृद्ध केला.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, कला शाखा प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. राखी साळगावकर व विज्ञान शाखा प्रमुख प्रा. वैभव घाणेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्लेसमेंट सेल सदस्य प्रा. वैभव कीर यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande