नांदेड - महिलांसाठीच्या विशेष आरोग्य शिबीराचे उद्घाटन
नांदेड, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। आज मंगळवार रोजी उमरी ग्रामीण रुग्णालय येथे ''स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान'' अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीराचे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पुनम राजेश पवार यांच्या हस्ते उ
अ


नांदेड, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। आज मंगळवार रोजी उमरी ग्रामीण रुग्णालय येथे 'स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान' अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीराचे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पुनम राजेश पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

महिला हिताच्या या अभियानाचा शुभारंभ करून महिलांना आरोग्यासंबंधी उपाययोजना, कार्यक्रमाची उद्दिष्टे आणि लाभाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या मोहिमेद्वारे महिलांसाठी विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या, मार्गदर्शन, पोषण व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे . तसेच, या अभियानाच्या माध्यमातून महिला आरोग्य सुधारणा, कुटुंबाची सशक्तीकरण आणि समाजातील सकारात्मक बदल साधणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले गेले आहे.

यासोबतच या कार्यक्रमादरम्यान रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी, डॉक्टर्स आदींशी संवाद साधून महिलांना या योजनेत सक्रिय सहभागी करून घेण्याचे आवाहन केले. तसेच, रुग्णालयातील सुविधा, कर्मचारी क्षमता आणि आरोग्य सेवांचा आढावा घेऊन या मोहिमेला प्रभावी पद्धतीने राबवण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी वैद्यकीय अधिक्षक अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, माता-भगिनी, अन्य मान्यवर तसेच भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande