नाशिकच्या देवळ्यातून चोरीस गेलेला ट्रॅक्टर सापडला जालन्यात
नाशिक, 30 सप्टेंबर (हिं.स.) : देवळा तालुक्यातील सुभाषनगर येथून चोरीस गेलेला ट्रॅक्टरचा देवळा पोलिसांनी तीन आठवड्याच्या आत जालना जिल्ह्यातून शोधून आणण्यात यश मिळवले. यापूर्वी तालुक्यातील भऊर व सटवाईवाडी येथील ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे उघडकीस आणून देवळा
नाशिकच्या देवळ्यातून चोरीस गेलेला ट्रॅक्टर सापडला जालन्यात


नाशिक, 30 सप्टेंबर (हिं.स.) : देवळा तालुक्यातील सुभाषनगर येथून चोरीस गेलेला ट्रॅक्टरचा देवळा पोलिसांनी तीन आठवड्याच्या आत जालना जिल्ह्यातून शोधून आणण्यात यश मिळवले. यापूर्वी तालुक्यातील भऊर व सटवाईवाडी येथील ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे उघडकीस आणून देवळा पोलिसांनी यशस्वी तपास केला होता. येवला तालुक्यातील अंदरसुल येथील अनिल ओमकार दळे यांचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर (एमएच१५/बीएस ७३५१) दोन महिन्यांपासून देवळा तालुक्यातील सुभाषनगर येथील सुनील बाळू आहिरराव यांच्या शेतीकामासाठी आणण्यात आला होता. दि. ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदर ट्रॅक्टर चोरून नेला. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी तपास जलदगतीने उघडकीस आणण्याच्या सूचना व मार्गदर्शन दिले. देवळा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भास्कर सोनवणे व संदीप चौधरी यांनी तपास सुरू केला. तपास सुरू असतांना छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेने अमोल सायराम गायकवाड व गोविंद निवृत्ती पवार (दोन्ही रा. बेलगाव, ता. वैजापूर) या दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना अटक करून चौकशी केली असता ते देवळा तालुक्यात येऊन गेल्याची माहीती मिळाली यामुळे संशय बळावून त्यांना देवळा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande