मुंबई, 30 सप्टेंबर (हिं.स.)। व्होल्टास बेको या होम अप्लायन्सेस क्षेत्रातील आघाडीच्या ब्रँडला त्यांच्या फेस्टिव्ह कॅम्पेन २०२५ च्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे, जी २८ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली आहे. हा देशव्यापी उपक्रम सणासुदीच्या काळादरम्यान अगदी योग्य वेळी सुरू करण्यात आला आहे, जेथे प्रमुख विक्री कालावधीदरम्यान ग्राहकांकडून अधिकाधिक मागणी होते.
ही नवीन फेस्टिव्ह कॅम्पेन व्होल्टास बेकोचे मुलभूत उत्पादन फायदे देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, जसे रेफ्रिजरेटर्समध्ये हार्वेस्टफ्रेश™ तंत्रज्ञान आणि वॉशिंग मशिन्समध्ये हायजिन+™, तसेच विक्री वाढवण्यासाठी ग्राहकांना आकर्षक ऑफर्स देण्यात येत आहेत. या वर्षीच्या उत्सवी संवाद धोरणामध्ये ब्रँडची विशिष्टता आणि विक्री-संचालित संदेशाचे संतुलित संयोजन आहे, जेथे रेफ्रिजरेटर्स व वॉशिंग मशिन्सवर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
या मोहिमेचा सणासुदीच्या काळादरम्यान भारतातील कुटुंबांमध्ये व्होल्टास बेकोला पसंतीचा ब्रँड म्हणून स्थित करण्याचा मनसुबा आहे. मार्की मीडिया मालमत्ता व डिजिटल-केंद्रित प्लॅटफॉर्म्ससोबत संलग्न होत ब्रँड जागरूकता, सहभाग आणि रूपांतरण टचपॉइण्ट्सवर उच्च दृश्यमानतेची खात्री घेईल.
या सीझनमध्ये उत्सवी प्रभाव वाढवण्यासाठी व्होल्टास बेकोने धोरणात्मक सर्वांगीण मीडिया प्लॅन लाँच केला आहे, जो ग्राहकांच्या सर्वसमावेशक सवयी आणि उच्च-सहभागात्मक क्षणांशी संलग्न आहे. टेलिव्हिजनवर ब्रँडने आशिया कप, बिग बॉस व केबीसी यांसारख्या मार्की एचएसएम मालमत्तांचा, तसेच जनतेपर्यंत पोहोच वाढवण्यासाठी लोकप्रिय मूव्ही चॅनेल्सचा फायदा घेतला आहे. यूट्यूब, ओटीटी, सीटीव्ही, जिओहॉटस्टार, सोशल मीडिया व ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर डिजिटल प्रयत्न करण्यात येत आहेत, ज्यामधून स्क्रिन्स व फॉर्मेट्सवर उपस्थितीची खात्री मिळते.
ग्राहकांचा हेतू व्यापून घेण्यासाठी मोहिमेने शोध, प्रदर्शन, स्थानिक व संदर्भीय जाहिरातींना प्राधान्य दिले आहे. उच्च-प्रभावी प्लेसमेंट्स जसे टीओआय रोडब्लॉक्स व जिओहॉटस्टार एकीकरणामुळे दृश्यमानता वाढते, तर इन-कन्टेन्ट अॅडस, सीटीव्ही फॉर्मेट्स व नायट्रो अंमलबजावणी सारख्या नाविन्यतांमुळे सहभाग वाढतो. प्रत्यक्षात व्होल्टास बेकोने अहमदाबाद, दिल्ली, गुरगाव, कोलकाता व मुंबईमधील प्रमुख उत्सवी केंद्रांमध्ये ओओएच क्रियाकलापांच्या माध्यमातून स्थानिक प्रासंगिकता निर्माण केली आहे. या एकीकृत दृष्टिकोनामधून ब्रँड प्रत्येक ठिकाणी उपस्थित असण्याची खात्री मिळते, जेथे ग्राहक साजरीकरण करतात, सहभाग घेतात आणि ऑनलाइन व ऑफलाइन खरेदी करतात.
व्होल्टबेक होम अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत बालन म्हणाले, ''व्होल्टास बेकोमध्ये सणासुदीचा काळ नेहमी साजरीकरणापेक्षा अधिक राहिला आहे, हा अर्थपूर्ण संबंध व स्मार्ट निवडींचा सीझन आहे. आमच्यासाठी हा काळ म्हणजे विक्रीचा सीझन, जेथे संपूर्ण भारतातील कुटुंबं त्यांच्या घरांना सुशोभित करू पाहतात आणि अप्लायन्सेसमध्ये गुंतवणूक करतात, जे दैनंदिन राहणीमान अधिक उत्साहित करतात. यंदा, आमची मोहिम ग्राहकांशी संलग्न होण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आली आहे, जी हार्वेस्टफ्रेश™ व हायजिन+™ सारख्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानांना दाखवते, तसेच आकर्षक उत्सवी डिल्स देते. आमचा एकाच फेस्टिव्ह पॅकेजमध्ये कार्यक्षमता, विश्वास व किफायतशीरपणाला एकत्र करत प्रत्येक खरेदीला बहुमूल्य, तसेच संस्मरणीय करण्याचा मनसुबा होता.''
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule