पुणे - नदीकाठ विकास प्रकल्पासाठी नाममात्र दराने 22 हेक्टर शासकीय जागा
पुणे, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। मुळा-मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्पासाठी तब्बल 22.26 हेक्टर शासकीय जागा नाममात्र दराने महापालिकेला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जमिनींसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 116 कोटींचा मोबदला मागितला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवा
पुणे - नदीकाठ विकास प्रकल्पासाठी नाममात्र दराने 22 हेक्टर शासकीय जागा


पुणे, 30 सप्टेंबर, (हिं.स.)। मुळा-मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्पासाठी तब्बल 22.26 हेक्टर शासकीय जागा नाममात्र दराने महापालिकेला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जमिनींसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 116 कोटींचा मोबदला मागितला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे हा मोबदला नाममात्र दराने निश्चित होणार आहे. आढावा बैठकीत पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉररूममधील हा प्रकल्प प्राधान्याने पुढे न्यायचा असल्याचे स्पष्ट करीत तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या संरक्षण खाते, महिला व बालकल्याण विभाग, बोटॅनिकल गार्डन आणि वन विभाग यांच्या ताब्यातील या जागांचे भूसंपादन महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. मात्र, या जमिनीच्या मोबदल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने 116 कोटी रुपयांची मागणी महापालिकेकडे केली होती. यासंदर्भात अजित पवार यांनी बैठक घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande