बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
ढाका, 01 जानेवारी (हिं.स.)।बांग्लादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीत. शरियतपूर जिल्ह्यात खोखोन चंद्र दास नावाच्या एका हिंदू युवकाला हिंसक टोळीने घेरून निर्दयपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता, उपद
बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न


ढाका, 01 जानेवारी (हिं.स.)।बांग्लादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीत. शरियतपूर जिल्ह्यात खोखोन चंद्र दास नावाच्या एका हिंदू युवकाला हिंसक टोळीने घेरून निर्दयपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता, उपद्रवींनी खोखोन दास यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यानंतर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (३१ डिसेंबर २०२५) घडली. मात्र, खोखोन यांनी जवळच्या एका तलावात उडी मारून कसाबसा आपला जीव वाचवला.

मिळालेल्या माहितीनुसार, खोखोन चंद्र हे एका फार्मसीचे मालक आहेत. ३१ डिसेंबर रोजी दुकान बंद करून घरी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. सध्या त्यांच्यावर शरियतपूर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बांग्लादेशमध्ये अवघ्या दोन आठवड्यांत एखाद्या हिंदूवर झालेला हा चौथा हल्ला आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात हिंदूंंसह इतर अल्पसंख्याकांवरील हिंसाचारात वाढ झाल्याचे दिसून येत असून, यामुळे जगभरातील लोकांमध्ये आणि अनेक मानवाधिकार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शेजारील देश बांग्लादेशमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांविरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले,“भारत बांग्लादेशमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि तेथील हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध यांसह अल्पसंख्याकांविरोधात सुरू असलेल्या शत्रुत्वपूर्ण कारवायांबाबत तीव्र चिंता व्यक्त करतो. अंतरिम सरकारच्या कार्यकाळात अल्पसंख्याकांविरोधात २,९०० हून अधिक हिंसक घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande