परभणीत मंगळवारपासून महिला बचत गटांचे विक्री-प्रदर्शन
परभणी, 01 जानेवारी (हिं.स.)। यशस्विनी महिला मंचच्या वतीने महिला बचत गट व महिला गृहउद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन शहरातील वसमत रस्त्यावरील जागृती मंगल कार्यालयात 2 ते 4 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले
परभणीत मंगळवारपासून महिला बचत गटांचे विक्री-प्रदर्शन


परभणी, 01 जानेवारी (हिं.स.)। यशस्विनी महिला मंचच्या वतीने महिला बचत गट व महिला गृहउद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन शहरातील वसमत रस्त्यावरील जागृती मंगल कार्यालयात 2 ते 4 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दररोज सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार असल्याची माहिती मंचच्या अध्यक्षा डॉ. संप्रिया पाटील यांनी दिली.

यशस्विनी महिला मंचच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. गेल्या काही वर्षांपासून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हे विक्री-प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. यंदाचे प्रदर्शन 2 जानेवारीपासून सुरू होत असून, 4 जानेवारी पर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

या प्रदर्शनात महिला बचत गट व महिला गृहउद्योजिकांनी तयार केलेले विविध प्रकारचे मसाले, कुरड्या, खाद्यपदार्थ, गृहशोभेच्या वस्तू तसेच अन्य गृहपयोगी वस्तूंचे विविध स्टॉल्स उपलब्ध असतील. आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी तयार केलेल्या वस्तूंना योग्य दर मिळावा तसेच थेट उद्योजक-ग्राहक नाते निर्माण व्हावे, या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या विक्री-प्रदर्शनाला महिलांसह नागरिकांनी भेट देऊन महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशस्विनी महिला मंचच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. संप्रिया पाटील यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande