
बीड, 01 जानेवारी (हिं.स.)। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड शहरात नव्यानं उभारण्यात येणाऱ्या सहकार संकुल इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले,ही इमारत बीडच्या विकासात मोलाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे.
बीडच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी अशी विकासकामं सातत्यानं सुरू राहतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis