शाश्वत विकासाकरिता युवा पिढीला घडवणारे सातदिवसीय निवासी शिबिर
बीड, 01 जानेवारी (हिं.स.)। श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय निवासी शिबिर कपिलधार वाडी येथे होणार आहे. ''शाश्वत विकासासाठी युबक जलसंधारण व पाणलोट क्षेत्र विकास'' हे शिबिराचे मुख्य थीम आहे. शिबिराचे उ
शाश्वत विकासाकरिता युवा पिढीला घडवणारे सातदिवसीय निवासी शिबिर


बीड, 01 जानेवारी (हिं.स.)।

श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय निवासी शिबिर कपिलधार वाडी येथे होणार आहे. 'शाश्वत विकासासाठी युबक जलसंधारण व पाणलोट क्षेत्र विकास' हे शिबिराचे मुख्य थीम आहे.

शिबिराचे उद्घाटन १ जानेवारी रोजी श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेच्या सचिव प्रा. सरोज सोंडगे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सहारा अनाथालय बालग्राम, गेवराईचे संचालक संतोष गर्जे उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धांडे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ब्रह्मनाथ मेंगडे, पाली-कपिलधारवाडीचे सरपंच महेंद्र वीर, मन्मथ स्वामी देवस्थान पंचकमिटीचे नागेशप्पा मिटकरी उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरात जलसंवर्धन, वनसंवर्धन, स्वच्छ ग्राम, पाणलोट क्षेत्र विकास, युवक विकास, पर्यावरण संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, आपत्ती व्यवस्थापन, बालविवाह निर्मूलन, ग्राम स्वच्छता यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी योगा, प्राणायाम, व्यक्तिमत्त्व विकास,सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, श्रम संस्कार, श्रमदानाचे उपक्रम राबवले जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होईल. ज्ञानवर्धक असे हे शिबिर असणार आहे. सात दिवसीय निवासी शिबिर७ जानेवारी पर्यंत कपिलधार वाडी येथे होणार आहे. यामध्ये विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande