डिजिटल माध्यमांमुळे साहित्य, वाचनसंस्कृतीत बदल : चव्हाण
बीड, 01 जानेवारी (हिं.स.)।डिजिटल माध्यमांमुळे साहित्य वाचकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचत आहे.त्यामुळे साहित्यासाठी नवे अवकाश खुले झाले आहे, असे मत प्रा. डॉ. अर्चना चव्हाण यांनी व्यक्त केले. डिजिटल माध्यमे, साहित्य व समीक्षा या विषयावर त्यांनी व्या
डिजिटल माध्यमांमुळे साहित्य, वाचनसंस्कृतीत बदल : चव्हाण


बीड, 01 जानेवारी (हिं.स.)।डिजिटल माध्यमांमुळे साहित्य वाचकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचत आहे.त्यामुळे साहित्यासाठी नवे अवकाश खुले झाले आहे, असे मत प्रा. डॉ. अर्चना चव्हाण यांनी व्यक्त केले. डिजिटल माध्यमे, साहित्य व समीक्षा या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात व्याख्यानमालेत पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. त्यांनी डिजिटल युगातील साहित्यनिर्मिती, प्रसार आणि समीक्षेतील बदलांवर सखोल भाष्य केले. ब्लॉग, ई-पुस्तके, मीडिया, प्रतिलिपी, बुक्स, वेब पोर्टल्स साहित्यनिर्मिती वाचनसंस्कृतीत आमूलाग्र बदल सोशल ऑडिओ यामुळे आणि झाला आहे. मात्र या बदलांसोबत साहित्यिक दर्जा, समीक्षेची जबाबदारी आणि मूल्यांकनाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल माध्यमातील समीक्षा तात्काळ प्रतिक्रिया देणारी असली तरी ती सखोल आणि वस्तुनिष्ठ असावी, असे त्यांनी सांगितले. पारंपरिक आणि डिजिटल समीक्षेतील फरक, संधी आणि आव्हानांचा त्यांनी उदाहरणांसह सविस्तर आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे यांनी साहित्य समीक्षेला नवी दृष्टी मिळाली असून समीक्षेचा केंद्रबिंदू बदलल्याचे मत मांडले. यावेळी प्रा. डॉ. पूर्वा अर्घापुरे, प्रा. डॉ. राजश्री कल्याणकर, प्रा. डॉ. अरुण चव्हाण, प्रा. डॉ. श्याम नेरकर व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या सातपुते यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. डॉ. राजश्री कल्याणकर यांनी केले. कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या अनुदानातून आयोजित व्याख्यानमालेला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी अभ्यासपूर्ण व सविस्तर अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande