
छत्रपती संभाजीनगर, 01 जानेवारी (हिं.स.)। पुराण कथेतील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली तब्बल पन्नास हजाराहून अधिक भाविकांनी घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घेतले आहे विशेष म्हणजे नववर्षाच्या शुभारंभ प्रसंगी गर्दी मोठी वाढली आहे.
नाताळ सुट्ट्यांमुळे वेरूळसह अजिंठ्यात पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. वेरूळमध्ये दिवसभरात ५५ हजार भाविकांनी घृष्णेश्वराचे दर्शन घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे
वेरूळमध्ये हजाराहून अधिक भाविक दर्शनासाठी येत होते. वेरूळ येथे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, लक्षविनायक शक्तिपीठ आणि विश्वकर्मा मंदिर ही तीन धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे येथे भाविकांची नेहमीच वर्दळ असते.
गर्दी झाल्यास भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून घृष्णेश्वर मंदिरात गाभाऱ्याबाहेरूनच दर्शन सुरू करण्यात आले आहे. गावाबाहेर पार्किंगची व्यवस्था आहे. वेरूळ ते खुलताबादमार्गे सकाळी चार तेरात्री नऊ वाजेपर्यंत जड वाहतूक बंद ठेवण्यात आली मंदिरात व्हीआयपी प्रोटोकॉलही बंद करण्यात आला होता.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis