पुणे - ऑनलाइन भाडेकरार नोंदणी दहा दिवसांपासून ठप्प
पुणे, 01 जानेवारी (हिं.स.)। ऑनलाइन भाडेकरारासाठी आधार कार्डची पडताळणी होत नसल्याने भाडेकराराची नोंदणी गेल्या दहा दिवसांपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील भाडेकरार नोंदणी थांबली आहे. गेल्या दहा दिवसांपासून संपूर
पुणे - ऑनलाइन भाडेकरार नोंदणी दहा दिवसांपासून ठप्प


पुणे, 01 जानेवारी (हिं.स.)। ऑनलाइन भाडेकरारासाठी आधार कार्डची पडताळणी होत नसल्याने भाडेकराराची नोंदणी गेल्या दहा दिवसांपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील भाडेकरार नोंदणी थांबली आहे. गेल्या दहा दिवसांपासून संपूर्ण राज्यातील सुमारे ६० हजार भाडेकरार प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.राज्य सरकारने भाडेकरार ऑफलाइन ऐवजी आता ऑनलाइन कऱण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नोंदणी मुद्रांक विभागाच्या ‘आय सरिता २.०’ आणि ‘१.९’ या ऑनलाइन पोर्टलवरून भाडेकरार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार पडताळणी केल्यानंतर भाडेकरार नोंदणीची पुढील प्रक्रिया केली जाते.गेल्या दहा दिवसांपासून भाडेकराराचे संकेतस्थळ बंद पडले आहे. त्यामुळे मुंबईच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून पाठविलेली आधार पडताळणीची विनंती यूआयडीएआयकडे पाठविली जाते. त्यानंतर आधारची पडताळणी होऊन भाडेकराराची प्रक्रिया पूर्ण होते. यूआयडीएआय या प्रणालीद्वारे आधारच्या पडताळणीसाठी माहिती तंत्रज्ञान विभागाला दर वर्षी परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. दर वर्षीप्रमाणे या वर्षीही डिसेंबर महिन्यात संकेतस्थळ गेल्या आठवड्यापासून बंद पडले आहे. त्यामुळे भाडेकरार नोंदणी ठप्प झाल्याची माहिती असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडरचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande