नाशिकमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरांमध्ये मोठी गर्दी
नाशिक, 01 जानेवारी (हिं.स.) । नववर्षाच्या पहिल्या दिवशी नाशिकमधील गोदातीरी आणि सभोवतालच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविकांनी नाशिकसह त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गड, शिर्डी
नववर्षाच्या पहिल्या दिवशीची सुरुवात


नाशिक, 01 जानेवारी (हिं.स.) । नववर्षाच्या पहिल्या दिवशी नाशिकमधील गोदातीरी आणि सभोवतालच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविकांनी नाशिकसह त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गड, शिर्डी, नसतानापुर आणि शनिशिंगणापूर येथे दर्शन घेतले.

नाशिकमधील गोदातीरीसह कपालेश्वर, नारोशंकर, एकमुखी दत्त, सांडव्यावरची देवी अशा प्रमुख ठिकाणी नागरिकांनी दिवसाची सुरुवात धार्मिक विधींनी केली.

नववर्षारंभानिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्रांमध्ये हजारो भाविक, सेवक आणि नागरिकांनी उपस्थिती नोंदवली. नववर्षाच्या पहिल्या दिवशी भक्तांनी श्री स्वामी महाराज आणि गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेतला. दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह देशभरातील समर्थ केंद्रांमध्ये भाविकांची मोठी उपस्थिती होती.

विशेष म्हणजे, दिंडोरी येथील प्रधान केंद्र बुधवारी रात्रीपासून गर्दीने फुलले होते. वर्षाच्या पहिल्या दिवशी गुरुवार असल्याने दुग्धशर्करा योगही आला, ज्यामुळे उपस्थितांची उत्सुकता अधिक वाढली. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरीत उपस्थितांशी साधर्म्य साधून चाळीस मिनिटे हितगुज केले आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

या धार्मिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित भाविकांनी नवीन वर्षासाठी गुरुमाऊली आणि महाराजांच्या आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होण्याची प्रार्थना केली.

------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande