
लातूर, 11 जानेवारी (हिं.स.)।
लातूर मंडळात लघुदाब वर्गवारीतील ४ लाख ४४ हजार ४१२ वीजग्राहकांकडे ११७ कोटी ८८ लाख रुपयांची थकबाकी आहे. अशावेळी थकबाकीदारांवर महावितरणने वसुली मोहीम वीजपुरवठा खंडीत केलेल्या वीजग्राहकांना पुनर्जोडणीचा दंड भरण्यापासून वाचायचे असेल तर देय तारखेच्या आत आपले वीजबील थकबाकीसह भरावे असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणने थकबाकी वसुली मोहिम अधिक गतिमान केली आहे. लातूर मंडळात लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक व इतर वर्गवारीतील ४ लाख ४४ हजार ४१२ ग्राहकांकडे ११७ कोटी ८८ लाख रूपये वीजबिलांची थकबाकी आहे. यामध्ये उदगीर विभागातील आज अखेर १ लाख ४१ हजार ८८१ विभागातील १ वीजग्राहकांकडे ४५ कोटी ११ लाख रूपये थकबाकी आहे. तर निलंगा लाख ७०२ वीजग्राहकांकडे २० कोटी ४४ लाख रूपये थकबाकी आहे. त्याचबरोबर लातूर विभागातील २ लाख १ हजार ८२९ वीजग्राहकांकडे ५२ कोटी ३३ लाख रूपये थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही गेल्या ९ दिवसात घरगुती ग्राहकांनी ६ कोटी ७९ लाख तसेच व्यावसायिक ग्राहकांनी २ कोटी ४ लाख, औद्योगिक ग्राहकांसह व इतर वर्गवारीतील २९ लाख रूपयांचे वीजबील भरले आहे. मागणीच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प असल्याने थकबाकीचा डोंगर सातत्याने वाढतच जात आहे.
महावितरणच्या संकेतस्थळावर, महावितरण मोबाईल अॅपद्वारे कधीही व कुठूनही ऑनलाईन पध्दतीने नेटबँकिंग, क्रेडिट-डेबिट-कॅश कार्ड, मोबाईल वॅलेटव्दारे वीजबिले भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला असल्यास पुर्नजोडणी शुल्कापोटी सिंगल फेजसाठी ३१० रुपये, थ्री फेजसाठी ५२० रुपये व अधिक जीएसटीसह भरावे लागतात. ही पुर्नजोडणी शुल्कही ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis