
छत्रपती संभाजीनगर, 11 जानेवारी (हिं.स.)।
सिडको बस स्थानकाच्या पार्किंगमध्ये उभी केलेली बस, एका दारूड्याने पार्किंगमधुन काढून फलाट चारवर लावली. या दारूड्याने बसची तोडफोड करून बसचे नुकसान केले.
बस घेऊन जाणाऱ्याचे नाव शुभम संजय निकम (२४, रा. हनुमान नगर, मुळ रा. भालेगाव, ता. मेहकर, जि. बुलडाणा) असे आहे. सुदैवाने या घटनेत प्राणहानी झाली नाही.
एसटी बसचालक पिराजी ज्ञानोबा सोनकांबळे (वय ४०, रा. पानशिवडी ता. कंधार जि. नांदेड) आणि वाहक बालाजी गायकवाड या दोघांनी बस देगलूरहून छत्रपती संभाजीनगराला आणली. प्रवासी उतरल्यानंतर पिराजी सोनकांबळे यांनी बस पार्किंगमध्ये लावली होती. पिराजी सोनकांबळे यांच्या नजरचुकीने बसची चावी वाहनातच राहिली. वॉशरूममधून दोघे पाच मिनिटांत परत आले. बस पार्किंगमध्ये त्यांना त्यांची बस दिसून आली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis