नांदेड वाघाळा महापालिकेत भाजपला बहुमत देण्याची हाक
नांदेड, 11 जानेवारी (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे नेते तथा खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत देण्याचे आवाहन केले आहे नांदेड शहरातील विविध प्रभागात त्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले या बैठकीमध
भाजपला नांदेड वाघाळा नगरपालिकेत बहुमत देण्याची हाक


नांदेड, 11 जानेवारी (हिं.स.)।

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत देण्याचे आवाहन केले आहे नांदेड शहरातील विविध प्रभागात त्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले या बैठकीमध्ये नागरिकांची थेट संवाद साधून भारतीय जनता पक्षाला बहुमत देऊन सत्ता द्यावी असे आवाहन केले आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष निश्चित पदांनी नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २ मधील चैतन्यनगरचे प्रतिष्ठित नागरिक जमिलभाई मिस्त्री यांच्या निवासस्थानी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना साथ देण्याचे व प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande