
बीड, 11 जानेवारी, (हिं.स.)।
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील ऊसतोड कामगार कै. गणेश डोंगरे यांचा धाराशिव जिल्ह्यातील समुद्राळ येथील साखर कारखान्यात झालेला दुर्दैवी अपघाती मृत्यू अत्यंत वेदनादायी, मनाला चटका देणारा आहे. कुटुंबाचा आधारवड अचानक हरपल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुःखद घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला भाजप आमदार सुरेश धस यांनी वैयक्तिक मदत करण्याचा शब्द दिला होता.
त्या शब्दपूर्ततेसाठी, “फुल नाही, फुलाची पाकळी” म्हणून आमदार सुरेश धस यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबासाठी ₹१,००,०००/- रुपयांची फिक्स्ड डिपॉझिट (FD) करण्यात आली आहे. सात वर्षांनंतर ही रक्कम दुप्पट होऊन त्यांच्या कुटुंबाला थोडा आर्थिक आधार मिळावा, हाच या मदतीमागील प्रामाणिक हेतू आहे.
ही आर्थिक मदत जयदत्त याने त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्त केली.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis