
कोल्हापूर, 11 जानेवारी (हिं.स.)।
सर्वसामान्य रुग्णांवर चांगले उपचार व्हावे यासाठी योग्य औषधोपचार झाले पाहिजेत म्हणूनच योग्य रोग निदान करण्याची आवश्यकता असते. हे काम लॅब टेक्नीशियन्स कडून चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी डॉक्टर्स, रुग्ण, लॅब टेक्नीशियन्स संघटना आणि सरकार यांच्या समन्वयातून येत्या अधिवेशनात चांगला प्रयोगशाळा नियंत्रण आणि नियमन कायदा करू असे ठोस आश्वासन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले ते असोसिएशन ऑफ क्लीनिकल लॅबोरेटरी अनालिसिस अँड प्रॅक्टिशनर( अक्लॅप) महाराष्ट्र संघटनेच्या १३ व्या राज्य परिषदेच्या दुसऱ्या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्ष स्थानी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ना. प्रकाश आबिटकर म्हणाले की लॅब टेक्निशियन्स यांच्याकडे अनेक अत्याधुनिक सोयी, सुविधा, साधने, मशीनरी तंत्र उपलब्ध असते पण त्याचा योग्य रोग, रुग्ण, डॉक्टर्स यांच्यासाठी वापर व्हावा असा सध्या कोणताच नियंत्रण, नियमन कायदा अस्तित्वात नाही. संघटनेच्या माध्यमातून पदाधिकारी अशा कायद्याची सातत्याने मागणी करीत आहेत. राज्यातील महायुती शासनाने आणि व्यक्तीश: आरोग्य मंत्री म्हणून मी याबाबत गांभिर्याने विचार करून यासाठी शासकिय स्तरावर आवश्यक ती कार्यवाही सुरु केली आहे. त्याला अंतिम स्वरूप देऊन प्रयोगशाळा नियंत्रण आणि नियमन कायदा नियंत्रण कायदा तयार करून येत्या मार्चच्या अधिवेशनात हा कायदा मंजूर केला जाईल.राज्यातील सर्वच लॅब टेक्निशियन्स यांनी रुग्ण हाच केंद्रबिंदू मानून काम करावे. यातून रुग्णांना लवकरात लवकर योग्य उपचार करता येतील.
शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात पार पडलेल्या या अधिवेशनात संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुळकर यांनी लॅब टेक्निशियन्स विभागासाठी स्वतंत्र असा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. संघटना यासाठी अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. या व्यवसायासाठी प्रयोगशाळा नियंत्रण आणि नियमन कायदा व्हावा अशी मागणी करीत आहोत असे सांगीतले.
प्रास्ताविक उमेश सोनार यांनी केले राजेश गरुड, आभार मानले. सुत्रसंचालन संदिप मगदूम यांनी केले. यावेळी शरद एकल, पंडित जाधव, राजेंद्र निगवे, मुकुंद पाणारी, राजीव पाटील, सागर बर्गे, समीर जमादार, बाहुबली पाटील, धनंजय वाडकर विजय गवळी, शहाजी किरोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar