
अकोला, 11 जानेवारी, (हिं.स.)।
अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांच्या मार्गदर्शनात अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा शहरातील मतदारांना वोटर स्लीप वाटपाचे कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अन्वये अकोला महानगरपालिका व्दारा विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेकरीता आवश्यक असलेल्या मतदार स्लीप वाटप करण्याचे कार्यवाही आवश्यक असल्याने अकोला महानगरपालिकेच्या एकूण 20 प्रभागांसाठी मतदार यादीवर काम करणारे 50 पर्यवेक्षकांना तसेच त्यांच्या अधिनस्त 500 बी.एल.ओ. आणि 150 आशा वर्कर असे एकुण 650 कर्मचा-यांच्या माध्यमातून मनपा क्षेत्रातील मतदारांना मतदार चिठ्ठी वितरण करण्याचे कार्य मनपा प्रशासनाव्दारा युद्ध पातळीवर सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे