
अकोला, 11 जानेवारी (हिं.स.)।
अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत 'एमआयएम'सोबत केलेल्या युती प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरु असतानाच आता अकोट चे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी मीडियाने चिंधीचा साप केल्याचं म्हटल्याने भारसाकळे यांनी आपले खापर मीडियावर फोडल्याची चर्चा आहे. 'एमआयएम' सोबतच्या युती संदर्भात अकोटचे भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे प्रचंड वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्याच पुढाकाराने झालेल्या या अभद्र युती प्रकरणी भाजपने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र, एवढं झाल्यानंतरही अकोटचे भाजपा आमदार प्रकाश भारसाकळेंनी याचं खापर मात्र माध्यमांवरच फोडलं आहे. याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांनी काहीही चुकीचं दाखवलं नव्हतं. माध्यमांच्या बातम्या बरोबर होत्या. अशा पद्धतीने एमआयएम सोबत युती करण्याचं काहीच कारण नसल्याचं बावनकुळे यांनी आमदार भारसाकळेंना ठणकावून सांगितलं आहे... अशा पद्धतीने एमआयएम सोबत युती करण्याचं काहीच कारण नसल्याचं बावनकुळे यांनी आमदार भारसाकळेंना सांगितलं. बावनकुळे हे अकोल्यात बोलत होते. एमआयएम'शी केलेली युती ही असमर्थनीय असल्याचं बावनकुळे यांनी आमदार भारसाकळे यांना सुनावलं आहे. आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यावर कारवाईसंदर्भात लवकरच मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे