
अकोला, 11 जानेवारी (हिं.स.)।
खदान पोलीस स्टेशन, अकोला हद्दीत दि. 03/01/2025 रोजी झालेल्या मोटारसायकल चोरीप्रकरणी नोंद असलेल्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने करून दोन आरोपींचा पर्दाफाश केला असून दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. दि. 05/01/2025 रोजी फिर्यादी नितीन अंबादास झामरे यांनी त्यांच्या मालकीची होंडा शाइन मोटारसायकल (किंमत अंदाजे ₹40,000) अज्ञात आरोपींनी चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने जेतवन नगर भागात सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. तपासात आरोपी-करण हरिदास बंगाले (वय 28, रा. जेतवन नगर, खदान), गणेश संजय धनेकर (वय 20, रा. जेतवन नगर, खदान) यांनी संगनमत करून खदान हद्दीतून दोन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. पंचासमक्ष दोन्ही मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून संबंधित गुन्हे उघडकीस आले आहेत (अप.क्र. 009/2026 व 011/2026, कलम 303(2) BNS). दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी खदान पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अकोला पोलीस दला तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या वाहनांना सुरक्षित कुलूपे लावावीत, सार्वजनिक ठिकाणी CCTV परिसरात वाहन उभे करावे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलीसांना कळवावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे