नायलॉन मांजापासून वाचण्यासाठी दुचाकी चालकांना सुविधा!
अकोला, 11 जानेवारी (हिं.स.)। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब यांचे संकल्पनेतुन आज पोलीस अधीक्षक कार्यालय समोर अकोला शहरातील नायलॉन (चायनिज) मांजा मुळे होणारे दुखापती किंवा अपघातस आळा घालण्याकरीता दुचाकी वाहन चालकांचे वाहनांवर २०० लो
H


अकोला, 11 जानेवारी (हिं.स.)।

अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब यांचे संकल्पनेतुन आज पोलीस अधीक्षक कार्यालय समोर अकोला शहरातील नायलॉन (चायनिज) मांजा मुळे होणारे दुखापती किंवा अपघातस आळा घालण्याकरीता दुचाकी वाहन चालकांचे वाहनांवर २०० लोखंडी आर्च तयार करून शहर वाहतुक नियंत्रण शाखा तर्फे लावण्यात आले.

नायलॉन (चायनिज) मांजा वापरामुळे मानवी जिवीतास गंभीर धोका निर्माण होत आहे. नायलॉन मांजा हा अत्यंत धारदार असुन दुचाकी स्वार, पादचारी यांचे गळे, चेहरा व हात कापले जाण्याचे अपघात घडत आहेत. तसेच हा मांजा पर्यावरणास घातक आहे. तसेच शासन आदेशानुसार नायलॉन /वायनीज मांज्याची निर्मीती, विक्री, साठवणुक व वापर पुर्णतः प्रतिबंधीत करण्यात आलेली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्तीस/व्यापा-याविरुध्द प्रचलीत कायदयानुसार गुन्हा दाखल करून दंडची कार्यावाही करण्यात येईल.

शहर वाहतुक नियंत्रण शाखा तर्फे पुढील ०७ दिवस दुचाकी वाहनांवर सेफटी लोखंडी आर्च लावण्याची मोहीम सुरू राहणार आहे. नायलॉन मांजा साठवणुक व वापर करणा-या विरूध्द माहिती असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष दुरध्वनी क. ०७२४-२४४५३३३, २४३५५००, किंवा संबंधीत पोलीस स्टेशनला माहिती दयावी.

तरी नागरिकांनी पतंग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर करू नये याबाबत सर्व जनतेस अकोला जिल्हा पोलीस दला तर्फे आवाहन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande