केजमध्ये एसटीचे ई - बस आगार आणि चार्जिंग स्टेशनसाठी मंजुरी
बीड, 11 जानेवारी (हिं.स.)। केज शहरात आता राज्य परिवहन मंडळाचे अद्ययावत ई - बस आगार आणि चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, यामुळे यामुळे के
केजमध्ये एसटीचे ई - बस आगार आणि चार्जिंग स्टेशनसाठी मंजुरी


बीड, 11 जानेवारी (हिं.स.)। केज शहरात आता राज्य परिवहन मंडळाचे अद्ययावत ई - बस आगार आणि चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. आमदार नमिता मुंदडा यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, यामुळे यामुळे के केजमधील प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर, प्रदूषणमुक्त आणि हायटेक होणार आहे.

प्रदूषणमुक्त प्रवासाचे नवे पर्व वाढते प्रदूषण आणि इंधनाचे दर पाहता राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक बसेसवर भर दिला जात आहे. केजमध्ये चार्जिंग स्टेशन आणि ई बस आगार झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या आणि स्थानिक मार्गांवर मोठ्या प्रमाणात शिवाई सारख्या इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना आवाजमुक्त आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी आणि शासनाकडील प्रशासकीय मंजुरीसाठी आमदार नमिता मुंदडा यांच्यासोबतच भाजपचे नेते अक्षय मुंदडा यांनीही विशेष लक्ष दिले होते.

ई-बस आगार आणि चार्जिंग स्टेशनमुळे केज तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्याच प्रमाणे केज शहरातून राज्याच्या विविध ठिकाणी धावणाऱ्या ई-बस येथील चार्जिंग स्टेशनमध्ये येवून चार्जिंग करतील. त्यामुळे स्टेशन व बस आगार परिसरात व्यवसायीकांना चांगला रोजगार उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प केज शहराच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे.

एकाच वेळी अनेक बसेस चार्ज करण्याची क्षमता असलेले हाय-स्पीड चार्जिंग स्टेशन. सुसज्ज बस आगार : ई-बसेसच्या देखभालीसाठी विशेष वर्कशॉप आणि कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सोयीसुविधा. पर्यावरण पूरक : डिझेलची बचत होऊन कार्बन उत्सर्जनात घट होईल. रोजगार संधी: नवीन आगार आणि स्टेशन‌मुळे स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande