
छत्रपती संभाजीनगर, 11 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेगमपुरा प्रभाग क्रमांक ३ येथील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले.या प्रचार फेरीत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नागराज गायकवाड, प्राजक्ता अमोल झळके, दुर्गा संजय फतेलष्कर व हंसराज नंदवंशी यांच्या प्रचारार्थ स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.
यावेळी नागरिकांच्या विविध समस्या, विकासाच्या अपेक्षा व प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहराचा वेगवान विकास, सक्षम प्रशासन व पारदर्शक कारभारासाठी कमळ या चिन्हासमोरील मतदान करून भारतीय जनता पार्टीला भरघोस पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले.नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सकारात्मक सहभाग पाहता प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठा जनसमर्थन लाभत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अशी माहिती खासदार भागवत कराड यांनी दिली आहे.
-------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis