बीड जिल्ह्यात तापमान घटले; उत्तरेकडील वाऱ्यांमुळे हुडहुडी वाढली
बीड, 11 जानेवारी (हिं.स. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच बीड जिल्ह्यात निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. गेल्या १० दिवसांत जिल्ह्याच्या किमान तापमानात तब्बल ६ अंशांची घसरण झाली असून, पारा १२ अंशांपर्यंत खाली आला आहे. उत्तर भारतात झालेल्या बर्फवृष्टी
बीड जिल्ह्यात तापमान घटले; उत्तरेकडील वाऱ्यांमुळे हुडहुडी वाढली


बीड, 11 जानेवारी (हिं.स.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच बीड जिल्ह्यात निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. गेल्या १० दिवसांत जिल्ह्याच्या किमान तापमानात तब्बल ६ अंशांची घसरण झाली असून, पारा १२ अंशांपर्यंत खाली आला आहे. उत्तर भारतात झालेल्या बर्फवृष्टीमुळे तेथून येणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्यांनी महाराष्ट्राची दिशा पकडली आहे. यामुळे मागील चार दिवसांपासून किमान तापमानात ६ अंशांनी घट झाली आहे. पुढील तीन दिवस हा बाज कायम राहणार आहे.

डिसेंबर महिन्यानंतर अचानक

थंडीत घट होऊन वातावरणातील उकाडा काही प्रमाणात वाढला होता. यामुळे जवळपास सहा ते सात दिवस थंडी गायब झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पुन्हा थंडीने कमबॅक केले आहे. सध्या उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली आहे. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला आहे. हे वारे अत्यंत कोरडे आणि थंड असतात. जेव्हा हे वारे सह्याद्री आणि सातपुडा पर्वत ओलांडून मराठवाड्यात प्रवेश करतात, तेव्हा जमिनीलगतचे तापमान वेगाने खाली घसरते. जानेवारी महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांत तापमान सरासरी ३० १८ अंशांच्या आसपास होते. मात्र, ५ जानेवारीनंतर हवेतील आर्द्रता कमी झाली आणि आकाश निरभ्र झाल्याने जमिनीतील उष्णता वेगाने उत्सर्जित झाली. बीडमध्ये कडाक्याची शीतलहर अनुभवायला मिळाली. यामुळे गायब झालेली थंडी पुन्हा बीड जिल्ह्यात अनुभवायला मिळत आहे. रात्रीच्या वेळी तसेच पहाटेच्या वेळी रस्त्यांवर होणारी गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे.

या कडाक्याच्या थंडीमुळे पहाटे घराबाहेर पडणे कठीण झाले असून, ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, ही थंडी रब्बी पिकांसाठी दुधारी तलवार ठरत आहे. गव्हाला थंडी पोषक असली तरी, हरभरा आणि भाजीपाल्यावर दव पडल्याने रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande