चंद्रपूर : मतदानाचा संदेश घराघरात, मनपा शाळांचा उपक्रम
चंद्रपूर, 11 जानेवारी (हिं.स.)। चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या मतदान जनजागृती अभियानांतर्गत चंद्रपूर मनपाच्या २६ शाळा व अनेक खाजगी शाळांनी एकाच दिवशी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करून
चंद्रपूर : मतदानाचा संदेश घराघरात, मनपा शाळांचा उपक्रम


चंद्रपूर, 11 जानेवारी (हिं.स.)।

चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या मतदान जनजागृती अभियानांतर्गत चंद्रपूर मनपाच्या २६ शाळा व अनेक खाजगी शाळांनी एकाच दिवशी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करून मतदान करण्याचा संदेश दिला.

या विविध प्रभागात काढण्यात आलेल्या रॅलींद्वारे नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देत लोकशाही सशक्त करण्याचा संदेश देण्यात आला. “मतदान करा, लोकशाही बळकट करा”, १५ जानेवारी लक्षात आहे ना, “प्रत्येक मत अमूल्य आहे”, “एक मत – उज्ज्वल भविष्य” अशा प्रभावी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या उपक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली.

याच उपक्रमाच्या अनुषंगाने सर्व शाळांमध्ये पालक सभेचेही आयोजन करण्यात आले. या सभेत पालकांना मतदानाचे महत्त्व, नागरिकांची जबाबदारी व लोकशाहीतील सहभागाचे मूल्य समजावून सांगण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन प्रभावीपणे करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande