मोफत शिक्षणाची फाइल अडविणारे मोफत प्रवास कसा देतील ? - चंद्रकांत पाटील
पुणे, 11 जानेवारी (हिं.स.)। ‘‘पैसे नाहीत म्हणून मुलींच्या मोफत उच्चशिक्षणाची फाइल सहा महिने अडवून येणारे अजित पवार पुणेकरांना मोफत पीएमपी, मेट्रो कशी देणार? मोफत प्रवासाचा निर्णय घ्यायचा असले तर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा विषय आणावा लागेल आणि
C Patil Punee


पुणे, 11 जानेवारी (हिं.स.)। ‘‘पैसे नाहीत म्हणून मुलींच्या मोफत उच्चशिक्षणाची फाइल सहा महिने अडवून येणारे अजित पवार पुणेकरांना मोफत पीएमपी, मेट्रो कशी देणार? मोफत प्रवासाचा निर्णय घ्यायचा असले तर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा विषय आणावा लागेल आणि त्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील,’’ अशा शब्दात भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांना आव्हान देत असताना आता राज्य सरकारमधील कुरबुरी यानिमित्ताने समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात सर्व नागरिकांसाठी पीएमपी आणि मेट्रो प्रवास मोफत देणार अशी घोषणा केली होती. भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर यावेळी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, धोरणात्मक व आर्थिक निर्णय हे मंत्रीमंडळाच्या बैठकीत होतात. पीएमपी व मेट्रोच्या मोफत प्रवास योजनेची घोषणा केली असली तरी अजित पवारांना आपण विजयी होणारच नाहीत हे माहिती असल्यानेच असे बोलण्यासाठी त्यांचे काही जात नाही. ही योजना कशी राबविणार असे प्रश्‍न विचारल्यावर ते घड्याळाचे बटण दाबले की मोफत तिकीट मिळेल असे सांगत आहे. यास काही अर्ध नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande