
लातूर, 11 जानेवारी (हिं.स.)।
: काँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशक विचारधारेला आणि विकासाभिमुख थोरणांना समर्थन देत भारतीय जनता पक्षाचे पानगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वर गुडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली असून काँग्रेस पक्षाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
या प्रवेशप्रसंगी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सर्व नवप्रवेशित पदाधिकारी व कार्यकत्यांचे काँग्रेस परिवारात मनःपूर्वक स्वागत केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, काँग्रेस हा सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष असून नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या अनुभवाचा आणि ताकदीचा पक्षाला निश्चितच फायदा होईल. पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. विशेषतः पानगाव जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला ग्रामीण भागात अधिक बळ मिळाले आहे. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत होऊन आगामी निवडणुकांमध्ये याचा
सकारात्मक परिणाम दिसून येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ईश्वर गुडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने आणि काँग्रेस पक्षाची पर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय व विकासाची भूमिका पटल्याने सर्वसामांन्याच्या हिताचे कार्यकरणारे सक्षम नेतृत्व काँग्रेसमध्ये असल्याने आपण असंख्य सहकार्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सोबत आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनीही काँग्रेसच्या नेतृत्वावर यावेळी विश्वास व्यक्त केला.
या पक्षप्रवेशा वेळी ईश्वर नाना गुडे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सरपंच पानगाव, श्रीरामजी हरिदास माजी चेअरमन
पानगाव सेवा सहकारी सोसायटी, आधी सह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच हा प्रवेश काँग्रेस पक्षासाठी उत्साहवर्धक ठरला असून आगामी काळात पक्षसंघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis