रत्नागिरी : दिवा- सावंतवाडी एक्स्प्रेस १५ मिनिटे लवकर सुटणार
रत्नागिरी, 11 जानेवारी, (हिं. स.) : कोकण मार्गावर प्रवाशांचा मोठा ओघ असलेल्या दिवा–सावंतवाडी रोड–दिवा एक्स्प्रेस गाडी सोमवार, १२ जानेवारीपासून पंधरा मिनिटे लवकर सुटणार आहे. दिवा–सावंतवाडी रोड–दिवा एक्स्प्रेसला दिवा आणि पनवेल येथे थांबा आहे. या गा
रत्नागिरी : दिवा- सावंतवाडी एक्स्प्रेस १५ मिनिटे लवकर सुटणार


रत्नागिरी, 11 जानेवारी, (हिं. स.) : कोकण मार्गावर प्रवाशांचा मोठा ओघ असलेल्या दिवा–सावंतवाडी रोड–दिवा एक्स्प्रेस गाडी सोमवार, १२ जानेवारीपासून पंधरा मिनिटे लवकर सुटणार आहे.

दिवा–सावंतवाडी रोड–दिवा एक्स्प्रेसला दिवा आणि पनवेल येथे थांबा आहे. या गाडीला नेहमीच मोठी गर्दी असते. ही गाडी दिवा स्थानकातून सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी निघते. आता सुधारित वेळापत्रकानुसार १०१०५ डाउन दिवा– सावंतवाडी एक्स्प्रेस सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी सुटणार आहे. यामुळे प्रवाशांना पहाटे लवकर दिवा जंक्शन रेल्वे स्थानकावर दाखल व्हावे लागणार आहे.

याशिवाय या एक्स्प्रेसच्या मार्गावरील इतर स्थानकांच्या वेळांमध्येही बदल करण्यात आले आहेत. पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ आणि सिंधुदुर्ग या स्थानकांवर ही गाडी आता वेळेच्या १० ते १५ मिनिटे आधी पोहोचणार आहे. सुधारित वेळापत्रक १२ जानेवारीपासून लागू होणार असून, प्रवाशांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सावंतवाडी रोड–दिवा जंक्शन एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ही गाडीही आता पूर्वीपेक्षा १० ते १५ मिनिटे आधी सुटणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande