
नांदेड, 11 जानेवारी (हिं.स.)माजी विधानपरिषद सदस्य, जनता दलाचे नेते गंगाधर पटणे यांचे आज दुःखद निधन झाले आहे. माजी आमदार पटणे यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निघून जाण्याने पक्षाचे अपरिमित नुकसान झाले आहे. जनता दल सेक्युलर, महाराष्ट्रच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो! आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांचे विचार व कार्य आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी असेल. अशा शब्दात श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
माजी आमदार गंगाधर पटणे महात्मा बसवेश्वराच्या विचार आणि कार्यावर आणि ग्रंथावर प्रेम करणारे,उत्कृष्ट वाचक, राजकारणी,संपादक,पत्रकार,लेखक, ग्रंथालय चळवळीचा आधारस्तंभ,शिक्षणप्रेमी, गुणग्राहक नेता माजी आमदारगंगाधर पटणे आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आमदार म्हणून त्यांनी काम केले आहे.अतिशय अभ्यासू नेता म्हणून जनता त्यांच्याकडे जनता पाहत आली आहे. तत्कालीन परिस्थितीत काँग्रेसचा दबदबा असताना त्यांना जनतेने आमदार म्हणून निवडून दिले होते. त्यांनी परिवर्तनवादी विचारधारेलात्यांनी बळ देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.महात्मा क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर,साने गुरूजी यांच्यावर निष्ठा असलेले सतत परिवर्तनवादी विचार रूजवत शिक्षक घडला तरच विद्यार्थी घडवतील म्हणून ते शिक्षकांना ग्रंथ वाचनाचा आग्रह धरत. शिक्षक ,पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी त्यांनी अनेक व्याख्याने,सानेगुरूजी कथामाला ,प्रबोधनसत्र आयोजित केले . समाजाची वैचारिक प्रगल्भता वाढली तर वेगवेगळ्या विकासाला गती मिळत असते. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी विकासाभिमुख विचार पेरणी केली. त्यांच्या पुत्राच्या निधनानंतर ते थोडे उदास झाले होते..परंतू त्यांनी स्वतः च्या दु:खाला बाजूला ठेवून सामाजिक कार्यात समर्पित कार्य करत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis