छ. संभाजीनगर : भाजपला विजयी करा रावसाहेब दानवे यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 11 जानेवारी (हिं.स.)। भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्रीरावसाहेब पाटील दानवेयांची प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या नेते पदाधिकारी यांनी नागरिकांशी संवाद साधला . माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्र
माजी केंद्रीय मंत्री दानवे यांचा स्थानिक नागरिकांशी संवाद,भाजपाला बहुमत द्यावे


छत्रपती संभाजीनगर, 11 जानेवारी (हिं.स.)। भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्रीरावसाहेब पाटील दानवेयांची प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या नेते पदाधिकारी यांनी नागरिकांशी संवाद साधला . माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती दिली आणि भारतीय जनता पक्षाला संभाजीनगर महापालिकेत बहुमत आणि विजयी करावे असे आवाहन केले.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर पडेगाव येथे प्रभाग क्रमांक 4 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार कुमारी तन्वी दीपक मुंडले, प्रियांका अनिल वाणी, दीपक बनकर व प्रीती अमोल रुईवाले यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा संपन्न झाली.

या जाहीर सभेस भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती दिली तसेच छत्रपती संभाजीनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीला भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहन केले. सभा दरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला असून, प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. विकास, विश्वास आणि नेतृत्वाच्या जोरावर प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande