नवीन मोंढा भागात पायाभूत सुविधा उभारणार - खा. अशोकराव चव्हाण
नांदेड, 11 जानेवारी (हिं.स.)। नांदेड वाघाळा महापालिकेत भाजपाचा महापौर होताच नवीन मोंढा भागात पायाभूत सुविधा उभारून व्यापारी, हमाल, मापाडी, शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजपा नेते खा. अशोकराव चव्हाण यांनी य
नवीन मोंढा भागात पायाभूत सुविधा उभारणार - खा. अशोकराव चव्हाण


नांदेड, 11 जानेवारी (हिं.स.)।

नांदेड वाघाळा महापालिकेत भाजपाचा महापौर होताच नवीन मोंढा भागात पायाभूत सुविधा उभारून व्यापारी, हमाल, मापाडी, शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजपा नेते खा. अशोकराव चव्हाण यांनी येथे दिले.

नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्र. ९ मधील भाजपा उमेदवार सौ. मंजुषा रानवळकर, किशोर स्वामी, सदिच्छा सोनी, बलवंतसिंघ गाडीवाले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. जितेश अंतापूरकर, प्रल्हाद काकांडीकर, बालाजी जाधव, राजेंद्र जिंके, शिवाजी दराडे, तानाजी चव्हाण, गणेश पाटील शिंपाळकर, अशोक टेकाळे, बालाजी गव्हाणे, नीळकंठ पडोळे यांची उपस्थिती होती.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपाच्या ताब्यात असून या माध्यमातून या भागातील व्यापायांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात येतील. हमाल-मापाडी यांचे प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील. मनपात भाजपाचा महापौर होताच नवीन मोंढा भागात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असे आश्वासन खा. अशोकराव चव्हाण यांनी येथे दिले. आ. रावसाहेब अंतापूरकर जनसेवा करताना कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले. त्यानंतर आपण पोरके झालो होतो, अशा वेळी खा. अशोकराव चव्हाण यांनी मला आपल्याला धीर देऊन देगलूर, बिलोली मतदारसंघात संधी देऊन दोन वेळा निवडून आणले. भाजपाने मातंग समाजाला न्याय दिला, असे प्रतिपादन आ. जितेश अंतापूरकर यांनी केले. यावेळी अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत आकाश गव्हाले, सतिश पवार, नंदू काळे, संदीप मिटकर, अजय शिंदे, सुनील जलवाड, नागेश पवार, कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजू पिंगलवाड, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande